29.6 C
New York

Manoj Kumar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन

Published:

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार यांचे निधन (Manoj Kumar Passes Away) झाले आहे. त्यांनी वयाच्या 87 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून ते आजारी होते. परंतु, काही दिवसांपूर्वीच त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, आज शुक्रवारी (ता. 4 एप्रिल) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मनोज कुमार हे अभिनेते तर होतेच, पण ते एक उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक सुद्धा होते. त्यांचे चित्रपट हे देशभक्तीवर आधारित असल्याने त्यांना “भारत कुमार” म्हणूनही ओळखळे जायचे. पण त्यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. (Manoj Kumar Passes Away, End of an era in Bollywood film industry)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून मनोज कुमार आजारी होते. प्रकृती अस्वास्थामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण अखेर त्यांची शुक्रवारी पहाटे प्राणज्योत मालवली. मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी ब्रिटिश भारताच्या वायव्य प्रांतातील (सध्या खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान) अबोटाबादमधील एका पंजाही हिंदू ब्राम्हण कुटुंबात झाला होता. मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी. फाळणीनंतर मनोज कुमार 10 वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब जंदियाला शेरखान इशून दिल्लीला स्थलांतरीत झाले. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. अशोक कुमार, दिलीप कुमार आणि कामिनी कौशल यांच्या चित्रपटांमुळे ते खूप प्रभावित झाले. यामुळे त्यांनी आपले हरिकिशन हे नाव बदलत मनोज कुमार असे केले.

मनोज कुमार यांनी कॉलेजच्या काळात अनेक नाटकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर ते मुंबईत आले. 1957 मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. मुख्य भूमिका असलेला त्यांचा पहिला चित्रपट राजा खोसला यांचा 1964 मधला मिस्ट्री थ्रिलर असलेला ‘वो कौन थी?’ सुपरहिट ठरला. त्याआधी त्यांनी 1958 मध्ये सहारा, 1959 मध्ये चांद, 1960 मध्ये हनीमून या चित्रपटांमध्ये काम केले होते. परंतु, मुख्य भूमिकेत अभिनेता म्हणून 1961 मध्ये आलेल्या ‘कांच की गुडिया’ या चित्रपटात त्यांनी काम केले. त्यांचा अभिनय लोकांच्या पसंतीस उतरला आणि त्यांनी 1961 मध्ये पिया मिलन की आस, सुहाग सिंदुर आणि रेश्मी रुमाल हे चित्रपट केले.

मनोज कुमार यांचे वह कौन थी, पूरब और पश्चिम, शोर, हरियाली और रास्ता, गुमनाम, शहीद, पत्थर के सनम, सावन की घटा, क्रांति हे सिनेमे अत्यंत सुपरहिट ठरले. शहीद सिनेमातील त्यांच्या शहीद भगतसिंहांच्या भूमिकेचे तत्कालिन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनीही कौतुक केले होते. 1962 मध्ये विजय भट्ट यांच्या ‘हरियाली और रास्ता’ या चित्रपटानं त्यांना सर्वात मोठे यश मिळाले, जो व्यावसायिकदृष्ट्या हिट ठरला. मनोज कुमार यांना त्यांच्या यशस्वी कारकिर्दीमुळे 1992 मध्ये पद्मश्री आणि 2015 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img