25.2 C
New York

Waqf Amendment Bill 2025 : वक्फ विधेयकावरील मतदानावेळी राष्ट्रवादीच्या दोन खासदारांची दांडी

Published:

वक्फ संशोधन विधेयक 2025 लोकसभेत मंजूर (Waqf Amendment Bill 2025) झाल्यानंतर राज्यसभेतही मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने 128 मते पडली तर 95 सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवले जाईल. यावर राष्ट्रपतींची सही होताच या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होऊन हा कायदा संपूर्ण देशात लागू होईल. राज्यसभेत या विधेयकावर आठ तासांपेक्षा जास्त वेळ चर्चा झाली. या चर्चेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. पण याच विधेयकावरील मतदानावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार गैरहजर (Sharad Pawar) होते.

राज्यसभेच्या आधी विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले होते. या विधेयकावरील मतदानावेळी शरद पवार गटाचे दोन खासदार गैरहजर होते. अमोल कोल्हे आणि सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे हे दोन खासदर हजर नव्हते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मतदानावेळी हजर राहता आले नाही असे नंतर सांगण्यात आले होते. परंतु, महत्वाच्या विधेयकावरील मतदानावेळी त्यांची गैरहजेरी मात्र चर्चा घडवून गेली.

Waqf Amendment Bill 2025 राज्यसभेतही विरोधकांची एकजूट

देशातील विविध मुद्द्यांवर विरोधी पक्षांचे एकमत नाही. परंतु, वक्फ विधेयकाच्या मुद्द्यावर लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही विरोधकांची एकजूट दिसली. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस या दोन पक्षांत प्रचंड वाद असताना वक्फ विधेयकावर मात्र दोन्ही पक्षांत एकी दिसली. लोकसभेत ज्यावेळी या विधेयकावर मतदान झाले तेव्हा 520 खासदारांनी यात सहभाग घेतला. 288 मते विधेयकाच्या समर्थनात पडली तर 232 मते विरोधात पडली. राज्यसभेतही 128 मते विधेयकाच्या समर्थनात तर 95 मते विरोधात पडली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img