ओतूर,प्रतिनिधी:दि.३१ मार्च ( रमेश तांबे )
ओतूर ( ता. जुन्नर ) येथील श्री कवठे येमाई यात्रेनिमित्त (Otur) आयोजित मॅटवरील महिलांच्या कुस्त्यांचा आखाडा लक्षवेधी ठरला. या कुस्त्यांच्या आखाड्यात महिला गटातील अंतिम फेरीमध्ये दिल्लीची बलजीत कौर व जुन्नरची विशाखा चव्हाण यांच्यात कुस्ती झाली.ही कुस्ती जुन्नरच्या चव्हाण यांनी जिंकल्याने, १५ हजार रूपये व मानाची गदा विशाखा चव्हाण यांनी पटकावली.
या आखाड्यासाठी ठाणे, पुणे, अहिल्यानगर, संगमनेर, नाशिक, जामखेड, परांडा,जुन्नर,आंबेगाव,संभाजीनगर, कोल्हापूर, कल्याण, मुंबई,अकोले, दिल्ली येथील महिला मल्लांनी हजेरी लावली.
आखाड्या निमित्त महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी खास इंदापूर येथील हलगी पथक बोलविण्यात आले होते. कुस्त्यांची सुरूवात २५०० पासून करण्यात आली शेवटची कुस्ती १५ हजार रूपयांची झाली.एकुण २० कुस्त्या झाल्या. मल्लांच्या मानधनासह आखाड्यासाठी १ लाख ४० हजार ५०० रूपये खर्च श्री कवठे यमाई यात्रा सोहळा कमिटी च्या वतीने करण्यात आला.
कुस्ती विजेत्या विशाखा चव्हाण यांना कवठे यमाई यात्रा कमिटीच्या वतीने १५ हजार रूपये व स्व: गोपाळराव रामभाऊ डुंबरे ( गुरूजी ) यांच्या स्मरणार्थ,त्यांची नात निशा जितेंद्र ढोबळे यांच्या वतीने गदा बक्षीस म्हणून देण्यात आली.
जय बजरंग सेवा गणेश मंडळ व श्री कवठे येमाई यात्रा कमिटीच्या वतीने दि,२८ रोजी महिलांसाठी आखाडा भरविण्यात आला होता.
या आखाड्यास माजी जि.प.सदस्य मोहित ढमाले, सरपंच छाया तांबे, उपसरपंच प्रशांत डुंबरे, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे, संचालिका नीलम तांबे,निशा ढोबळे,निर्मला तांबे,नीलेश तांबे, मंडळाचे अध्यक्ष जयसिंग डुंबरे,उपाध्यक्ष शंकरराव डुंबरे, सचिव धोंडीभाऊ मोरे,शांताराम तांबे,उल्हास तांबे,दिलीप तांबे,श्रीराम डुंबरे,अँड जयराम तांबे,बाळासाहेब डुंबरे,कैलास डुंबरे,गणेश डुंबरे,सुनिल काळे,भुषण डुंबरे,दीपक लाहोरकर,निलेश येवले,प्रा.गोविंदराव माळवे,जालंदर पानसरे,संभाजी गायकर,संजय तांबे,राजेंद्र थोरात,शंकर गीते,पुजारी कैलास ढगे,मंगल शेटे,सुशिला तांबे यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.