19.7 C
New York

Sunita Williams : पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्स यांना ‘या’ आरोग्य समस्यांना द्यावे लागणार तोंड

Published:

अंतराळात 9 महिने राहिल्यानंतर आज अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बुच विल्मोर (Butch Wilmore) हे पृथ्वीवर परतले आहे. दोन्ही अंतराळवीर 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (International Space Station) पोहोचले होते. त्यांचा प्रवास फक्त 8 दिवसांचा होता मात्र तांत्रिक अडचणींमुळे त्यांना 9 महिने तिथेच राहावे लागले. 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परतल्याने दोघांनाही आता अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

अवकाशात गुरुत्वाकर्षण कमी झाल्यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम दिसून येतील तसेच जास्त काळ अवकाशात राहिल्याने त्यांच्या शरीरावर अनेक बदल देखील दिसून येऊ शकतात.

Sunita Williams पाठीचा कणा, कंबर आणि पायांमध्ये खनिजांची कमतरता

या बाबात इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, अंतराळात बराच काळ घालवल्यानंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. अंतराळातील सूक्ष्म-गुरुत्वाकर्षणामुळे, कंबरेच्या आणि पायांच्या स्नायूंचा आकार आणि ताकद कमी होण्याची शक्यता असते. कारण अंतराळात पायांचा जास्त वापर होत नाही. यामुळे हाड फ्रॅक्चर होण्याचा धोका असू शकतो. पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना उभे राहणे आणि चालणे कठीण होऊ शकते.

Sunita Williams मानसिक आरोग्यावर परिणाम

9 महिने अंतराळवर घालवल्यानंतर पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना मानसिक त्रास देखील होऊ शकतो. 9 महिने एकटे राहिल्याने दोघेपण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. तसेच त्यांना पुन्हा एकदा दैनंदिन दिनचर्येत परत येण्यासाठी वेळ लागू शकतो.

Sunita Williams कर्करोगाचा धोका ?

अवकाशात उच्च-ऊर्जेच्या वैश्विक किरणोत्सर्गापासून कोणतेही संरक्षण नसल्याने अंतराळवीरांना सूर्यापासून येणाऱ्या किरणोत्सर्गाच्या उच्च पातळीला सामोरे जावे लागते. 9 महिन्यात सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या किरणोत्सर्गाच्या संपर्कात राहिल्याने त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते आणि त्यामुळे त्यांना कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img