17.2 C
New York

Ajit Pawar : राजकारणातील मोठी बातमी! अजित पवार बारामती सोडणार

Published:

लोकसभेप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीतही बारामती विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले आहे. (Ajit Pawar) बहुप्रतिष्ठित मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातूल लढतीकडे असतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात नुकतंच एक महत्वाचं विधान केलं होतं. बारामतीत जो उमेदवार आपण देऊ त्याला निवडून द्या, असे ते म्हणाले होते. अप्रत्यक्षरित्या बारामतीमधून लढणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले होते. अजित दादा मात्र बारामतीमधून नव्हे तर मग कुठून निवडणूक लढवणार असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकांचं वादळ काही दिवसांवर येऊन ठेपलय. काही दिवसांत निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात राज्यातील सर्वच पक्षांनी आपापली गणित मांडायला सुरूवात केली आहे. आता महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी बारामतीमधून नव्हे तर शिरूर विधानसभा मतदारसंघातून लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

रिपोर्ट्सनुसार, अजित पवार हे यंदा बारामतीमधून नव्हे तर शिरूरमधून विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे. हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे अजित पवार शिरूरमधूनच निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. म्हणून भाजपने या मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती घेतबापाशी भिडा; CM शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान नाहीत. एक प्रकारे शिरूर मतदारसंघ हा अजित पवारांना सोडणार असल्याच्या चर्चा असून मात्र त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते मात्र अस्वस्थ झाल्याचे समजते.

बापाशी भिडा; CM शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान

Ajit Pawar निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखती सुरू

अवघ्या महिन्याभरावर आलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी महायुती-मविआकडून जागावाटपाच्या मुद्यांवर चर्चा सुरू आहे. निवडणुकीतील उमेदवार निवडीसाठी तसेच मविआ, महायुती आणि सर्वच पक्षांकडून मुलाखत घेण्यासाठीही सुरूवात केली आहे. दरम्यान शिरूर हा मतदारसंघ पुणे जिल्ह्यातील भाजपाकडे आहे मात्र तेथे अद्याप कोणत्याही उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे हा मतदारसंघ जाण्याची चर्चा आहे. पण अजित पवार गटाकडे सध्या तगडा उमेदवार नाही, त्यामुळे खुद्द अजित पवार हेच या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यांचे नाव पुढे आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिरूरमधून गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅडव्हकेट अशोक पवार विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे माजी आमदार (स्वर्गीय) बाबुराव पाचरणे यांचा पराभव केला होता. पक्षफुटीनंतर विद्यमान आमदार अशोक पवार हे शरद पवारांसोबतच राहिले. त्यामुळे यावेळीही महाविकास आघाडी कडून त्यांनाच संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img