तामिळनाडुच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील प्रसिद्ध सेंद्रिय शेतकरी आणि पद्म पुरस्कार विजेत्या (Organic farmer Pappammal) पप्पम्मल यांचं काल रात्री वृद्धवामुळे निधन झालं. पप्पम्मल यांनी वयाच्या 108 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (Organic ) त्यांचं जीवन शेती आणि समाजसेवेसाठी समर्पित होतं आणि त्यांना 2021 मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पप्पम्मल यांनी सेंद्रिय शेतीला चालना देण्यात आणि त्याचे महत्त्व समजावून सांगण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या एक कुशल शेतकरी तर होत्याच, पण त्यांनी तिच्या आयुष्यात सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाने कृषी क्षेत्रातील असंख्य लोकांना प्रेरणा दिली आहे.
Organic farmer Pappammal पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त
सेंद्रिय शेतकरी पप्पम्मल यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. कृषी, विशेषत: सेंद्रिय शेतीमधील पप्पम्मल यांच्या योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे. पप्पम्मल यांच्या स्वभावात नम्रता आणि सौम्यता होती. लोक आजही त्याचं कौतुकाने करतात. पंतप्रधानांनी त्यांच्या कुटुंबीय आणि हितचिंतकांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.
महायुतीचं ठरलं, 225 जागांवर एकमत, ‘या’ दिवशी होणार घोषणा
Organic farmer Pappammal मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून शोक व्यक्त
जणू मी माझ्या कुटुंबातील एक सदस्य गमावला आहे. त्या केवळ शेतकरीच नव्हत्या तर समाजासाठी एक मोठी प्रेरणा होती.” मुख्यमंत्र्यांनी पप्पम्मल यांना आदरांजली वाहिली आणि त्यांच्या योगदानाचे स्मरण केले. त्यांच्या निधनाने तामिळनाडू आणि संपूर्ण देशात, विशेषतः कृषी आणि सामाजिक क्षेत्रात पोकळी जाणवत आहे. त्यांच्या जीवनाचा वारसा कायम स्मरणात राहील आणि त्यांच्या प्रेरणेने अनेक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना नवी दिशा दाखवली.