13.2 C
New York

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या लाडूंवर उंदरांची पिल्ले ? व्हिडिओ व्हायरल

Published:

मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातून (Siddhivinayak Temple) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादात उंदरांची पिल्लं आढळली आहेत. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला, यानंतर मंदिर परिसरातील स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. आंध्र प्रदेशात तिरुपती येथील तिरुमला बालाजी मंदिरातील लाडवांमध्ये प्राण्यांच्या चरबीचे अंश सापडल्यानंतर विविध मंदिरातील प्रसादांच्या गुणवत्तेबाबत नवीन वादाला तोंड फुटले आहे. अशातच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या महाप्रसादात उंदरांचा सुळसुळाट झाल्याचा दावा केला जात आहे. वास्तविक, एक व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिराचा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रसादाच्या पाकिटांवर उंदरांचे पिल्लू दिसत आहे.

मुंबईतील प्रसिद्ध व हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. उंदराची पिल्ले सिद्धिविनायक मंदिराचे प्रसाद जिथे ठेवले जातात तिथे आढळली असल्याचा दावा करण्यात येत आहे. स्वच्छ ठिकाणी त्यामुळं प्रसाद ठेवले जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासंबंधीत एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

कोकण, मराठवाडा अन् विदर्भात जोरधार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते. उंदराची पिल्ले महाप्रसादाचे लाडू जिथे ठेवले जातात त्या ट्रेमध्ये आढळली आहेत. त्यामुळं मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील लाडूंच्या शुद्धतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. एका मोठ्या ट्रेमध्ये प्रसादाचे लाडू ठेवण्यात आले असून त्यात मेलेला उंदीर असल्याचे दिसत आहे. व्हायरल व्हिडिओनंतर एकच खळबळ उडाली आहे.

Siddhivinayak Temple मंदिरातील स्वच्छता आणि शुद्धतेवर प्रश्नचिन्ह

लॅब टेस्टनुसार, हे महाप्रसादाचे लाडू 7 ते 8 दिवस सुरक्षित ठेवता येतात. मात्र, लाडूंमध्ये उंदरांची पिल्लं आढळून आल्याने मंदिरातील प्रसादाच्या स्वच्छता आणि शुद्धतेबाबत मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img