19.1 C
New York

Police Crime : लष्करी अधिकाऱ्याच्या वधूबरोबर पोलीस ठाण्यात घृणास्पद कृत्य

Published:

लष्करातील अधिकाऱ्याच्या वाग्दत्त वधूवर लैंगिक (Police Crime) अत्याचार केल्याच्या आरोपावरून ओडिशा पोलीस मुख्यालयाने भरतपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षकासह पाच अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. (Crime) तसंच, लष्करी अधिकाऱ्याला मारहाण आणि त्याच्या वाग्दत वधूवर लैंगिक टिपणी केल्याप्रकरणी अभियांत्रिकीच्या सात विद्यार्थ्यांना अटक केल्याचं पोलीस आयुक्तालयाने शनिवारी सांगितलं.

अत्यंत घृणास्पद घटना रविवारी (ता. १५) रात्री उशीरा घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी सात विद्यार्थ्यांना काल अटक केली. त्यांना लगेच न्यायालयात हजर करण्यात आलं. भुवनेश्‍वरमधील पथरागडीयाजवळ तीन मोटारीतून आलेल्या १२ जणांनी लष्करी अधिकाऱ्याचं वाहन अडवलं होतं. अधिकाऱ्याने प्रतिकाराचा प्रयत्न केला असता त्याला गाडीतून बाहेर काढून मारहाण केली. गुंडांच्या तावडीतून पळून जाण्यात हे जोडपे यशस्वी झाले. भरतपूर ठाण्यात रात्री दोन वाजता पोचल्यावर त्यांनी हल्लेखोरांविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली. भरतपूर स्थानकातील पोलिसांनी तक्रारीची दखल घेण्याऐवजी त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप या जोडप्याने केला.

आमच्या तरुणांना मारहाण, जरांगे पाटलांकडून फडणवीसांवर प्रहार

तिला विवस्त्र करून कोठडीत लैंगिक अत्याचार केला. पोलिसांना विरोध करताना संबंधित महिलेने एका महिला पोलिसाच्या हाताला चावे घेतले. पोलिसांनी नंतर महिलेला अटक करून तुरुंगात ठेवलं. ओडिशा उच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला. पोलिसांनी महिलेवर केलेल्या कथित अत्याचारामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.

या घटनेची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. भरतपूर पोलीस स्थानकामध्ये लष्करी अधिकारी आणि त्यांच्यासमवेत असलेल्या एका महिलेवर झालेल्या गैरवर्तन आणि मारहाणीचे आरोप सरकारने गांभीर्याने घेतले आहेत. या प्रकरणाचा तत्काळ तपास करून विहित मुदतीत अहवाल सादर करण्याचे निर्देश गुन्हे शाखेला देण्यात आले आहेत. दोषींना कायद्यानुसार शिक्षा होईल. असे कार्यालयाने निवेदनात म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img