19.1 C
New York

Asian Champions Trophy 2024 : भारताने चीनचा 1-0 असा पराभव करत पाचव्यांदा पटकावले आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद

Published:

17 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या (Asian Champions Trophy 2024) अंतिम सामन्यात भारताने चीनचा 1-0 असा पराभव करून आपले पाचवे विजेतेपद मिळवले. हा सामना अत्यंत तणावपूर्ण आणि प्रतिस्पर्धी होता. भारतासाठी एकमेव आणि निर्णायक गोल जुगराज सिंगने 51व्या मिनिटाला केला, ज्यामुळे भारताने विजय मिळवला. भारताच्या कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या उत्कृष्ट खेळामुळे त्यांनी “प्लेयर ऑफ द टूर्नामेंट” पुरस्कार देखील पटकावला. या जेतेपदाच्या लढतीत चीनने भारताला कडवी झुंज दिली. अंतिम फेरीतील एकमेव गोल चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय खेळाडूने केला. चौथ्या क्वार्टरमध्ये, जुगराज सिंगने मैदानी गोल करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली, जी विजयासाठी पुरेशी होती, भारताने उपांत्य फेरीत कोरियाचा पराभव केला, तर चीनने उपांत्य फेरीत पाकिस्तानला पराभूत करून अंतिम फेरीचे तिकीट बुक केले.

या सामन्यात भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगला गोल करता आला नसला तरी जुगराजच्या गोलमध्ये त्याने मोठा हातभार लावला. या सामन्यात चीनच्या बचावफळीनेही चांगली कामगिरी करत भारताला दीर्घकाळ गोल करण्यापासून रोखले. या वेळी चीनला चार पेनल्टी कॉर्नर मिळाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img