21.7 C
New York

Sharad Pawar : संविधानाच्या लढ्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाला सोबत घेणार – शरद पवार

Published:

मुंबई / रमेश औताडे

संविधानाचा लढा मजबूत करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाला सोबत घेण्यात येईल. अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने सादर केलेल्या एका अहवालाच्या पार्श्वभूमीवर दिली.

पक्षाचे अध्यक्ष नारायण बागडे यांनी सिल्वर ओक बंगल्यावर ” लोकसभा निवडणूक एक सविस्तर अहवाल ” शरद पवार यांना भेटून सादर केला त्यावेळी पवार बोलत होते. मागिल लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आंबेडकरी रिपब्लीकन मोर्चाने आंबेडकरी मतदानाचे विभाजन टाळून संविधानाच्या बाजूने उभे असलेल्यांना विजय प्राप्त करून कसा दिला याची सर्व विभागवार माहिती या अहवालात बागडे यांनी दिली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे मोठे नेते प्रतिगामी पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसले होते तर काही पक्ष आघाडी मतदानाचे विभाजन करून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र जेव्हा संविधानाचे अस्तित्व धोक्यात होते अशा वेळेस मोठी जबाबदारी आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीच्या कार्यकर्त्यांवर आली होती. तेव्हा याच कार्यकर्त्यांनी प्रस्थापित नेत्यांचा घातकी हेतू नाकारून पुरोगामी परिवर्तनवादी पक्षाच्या बाजूने दंड थोपटले होते. हिच बाब या अहवालातून आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली असता पवार यांनी याबाबत बागडे यांचे कौतुक केले. यावेळी शाम बागुल, प्रा.रमेश दुपारे, दिलीप कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img