19.1 C
New York

Eknath Khadse : महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे; खडसेंचं बाप्पाला साकडं

Published:

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छूक असलेल्या एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) मोठ वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राची राजकारणाची स्थिती सध्या चांगली राहिलेली नाही. जनता महागाईने, फोडाफोडीच्या राजकारणाने त्रस्त असून, येणारं सरकार महाविकास आघाडीचे असेल असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच (Mahavikas Aghadi) पुढच सरकार येऊ दे असे साकडं बाप्पाकडे घातल्याचे खडसेंनी म्हटले आहे. (Eknath Khadse On Maharashtra Politics)

खडसे म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही वाजत गाजत आणि उत्साहात आमच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. दहा दिवसांच्या गणपती उत्सवकाळात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते असे खडसे म्हणाले. गणराय हा विघ्नहर असून, त्याने सर्वांवरील विघ्न हरण केले पाहिजे असं साकडं खडसेंनी घातलं.

विधानसभेच्या निवडणुकांवेळी भूमिका मांडू असे म्हणत सध्या राज्यातील राजकारणाची स्थिती फार काही चांगली नाहीये. राज्यातील जनता महागाईने चिंताग्रस्त असून, सध्या केवळ फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. हे सर्व बघता आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आलं पाहिजे असे साकडे खडसेंनी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बाप्पाला घातले आहे.

गणेशोत्सवाच्या मुख्यमंत्र्यांकडून जनतेला शुभेच्छा

Eknath Khadse फडणवीस-महाजन नड्डांपेक्षाही मोठे

तत्पूर्वी काल (दि.6) खडसेंनी भाजप प्रवेशाबाबत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, भाजपात माझा प्रवेश झाल्याचे सांगितलं जात असलं तरी, अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. राज्यातील नेते यावर काहीच बोलण्यास तयार नाहीत आणि विशेष म्हणजे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनीही याचा खुलासा केलेला नाही. या गोंधळातच खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यापेक्षा फडणवीस आणि महाजन मोठे नेते आहेत, अशी खोचक टीका नाथाभाऊंनी केली.

शरद पवार गटात प्रवेश करण्याआधी सन 2009 ते 2014 या काळात एकनाथ खडसे विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यात 120 जागांवर विजय मिळवला. त्यावेळी खडसे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. परंतु, पक्षाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले. खडसे यांना मात्र काही महत्वाच्या खात्यांवर समाधान मानावे लागले. यानंतर 2016 मध्ये एकनाथ खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर पुढील चार वर्षे ते राजकारणात विजनवासात पडले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img