17.6 C
New York

Pooja Khedkar : पूजा खेडकरला कोर्टाचा दिलासा, तुर्तास अटकेपासून संरक्षण

Published:

बडतर्फ करण्यात आलेल्या माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकरबाबत (Pooja Khedkar) आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. कोर्टाने पूजा खेडकरला मोठा दिलासा दिला आहे. पूजा खेडकरला 26 सप्टेंबरपर्यंत अटक करू नका असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करावी असेही न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान, या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावं अशी मागण करत पूजा खेडकरने न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणी सुनावणी होऊन पूजा खेडकरला दिलासा मिळाला आहे.

माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण (Pooja Khedkar) देशभरात गाजलं. बोगस कागदपत्रांची पूर्तता करून युपीएससी रँकची नोकरी मिळवली. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर (UPSC) पूजा खेडकरचे अनेक कारनामे समोर आले. तिच्या नोकरीवर गदा आलीच शिवाय गुन्हाही दाखल झाला होता. यानंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिल्ली न्यायालयात एक अहवाल दाखल केला होता. या अहवालामुळे पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या होत्या.

पोलिसांनी या प्रकरणी दहा दिवसांत सविस्तर तपास करावा असेही निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे पूजा खेडकरला तूर्तास दिलासा मिळाला आहे. सध्या पूजाला अटक होणार नाही. पूजा खेडकरने दिल्ली न्यायालयात प्रतिज्ञापक्ष दाखल केले आहे. यामध्ये तिने काही अजब दावे केले आहेत. पूजा खेडकरने बारा वेळा यूपीएससीची परीक्षा दिली होती. यापैकी पाच वेळा तिने दिव्यांग कॅटेगरीतून परीक्षा दिली होती. त्यामुळे बाकीच्या सात परीक्षा गृहीत धरू नये असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

राष्ट्रवादीच्या दोन रूपालींमध्ये रंगला ‘आमदारकीवरुन’ वाद ….

यूपीएससीनेही एक निवेदन प्रसिद्ध केले होते. यात स्पष्टपणे म्हटले होते की खेडकरच्या सर्व कारवायांची तपासणी करणयात आली आहे. यामध्ये असे दिसून आले आहे की पूजा खेडकरने नाव बदलून तसेच इतर माहितीत फेरफार करून परीक्षांतर्गत नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच तिने स्वतःच्या माहितीत आणि नावातही बदल केल्याचे यूपीएससीने म्हटले होते.

Pooja Khedkar पूजा खेडकरचं प्रमाणपत्र बनावट?

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्रा संदर्भात एक अहवाल दिल्ली उच्च न्यायालयात सादर केला आहे. गुन्हे शाखेने अनेक धक्कादायक बाबी या अहवालात नमूद केल्या आहेत. या अहवालातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे पूजा खेडकरचं दिव्यांग प्रमाणपत्र बनावट असल्याचं दावा या अहवालात करण्यात आला आहे. खेडकरने प्रमाणपत्रातील नावातही बदल केला आहे. सन 2022-2023 मधील सिव्हिल सेवा परीक्षेत पूजा खेडकरने खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचे या अहवालात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img