19.2 C
New York

Pushpa 2 : बहुप्रतीक्षित ‘पुष्पा 2’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज,

Published:

Pushpa 2 : साऊथचा सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन त्याच्या ‘ पुष्प २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर याच्या पहिल्या पार्टने बक्कळ कमाई केली आहे.त्याच्या या पहिल्या पार्टच्या भूमिकेसाठी अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारदेखील मिळाला आहे. शूटिंगदरम्यानचे अभिनेत्री रश्मिका आणि अल्लू अर्जुन यांचे अनेक लुक व्हायरल झाले आहेत.‘पुष्पा द रुल’ या चित्रपटाच नवीनच पोस्टर समीर आलं असून, चित्रपटाची रिलीज डेटही जाहिर करण्यात आली आहे. ‘पुष्पा : द रूल’ चित्रपटासाठी आता चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असताना ही गोड बातमी समोर आलीय.

Pushpa 2 चित्रपटाचे नवीन पोस्टर समोर

निर्मात्यांनी या चित्रपटच नुकतच नवीन पोस्टर शेअर केलं आहे. अर्जुन’पुष्पराज’च्या अवतारात अभिनेता अल्लू अर्जुन आपल्यला दिसत आहे. पुष्पा 2 चित्रपट तब्बल १०० दिवसांनी आजपासून थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे. पुष्पा 2 या चित्रपटाच्या नवीन पोस्टरने मात्र चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. अल्लू अर्जुन चित्रपटाच्या फर्स्ट-लूक पोस्टरमध्ये महिलेच्या वेशात पाहायला मिळाला होता. त्याच वेळी ‘गंगम्मा तल्ली जथारा’ मध्ये अल्लू अर्जुन सामील होणार असल्याचे म्हटले गेले. ‘गंगाम्मा तल्ली जथारा’ ही एक पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. आठवडाभर दर वर्षी हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या अगदी शेवटच्या दिवशी पुरुष स्त्रियांच्या वेशभूषा करतात व गंगम्माच्या रूपात दिसतात.

पश्चिम महाराष्ट्रात ‘राष्ट्रवादी’ सुसाट, पंढरपुरात ‘कमळ’ सुकणार

कधी रिलीज होणार पुष्पा 2?

सुकुमार दिग्दर्शित तसेच फहद फासिल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या पहिल्या पार्टने बक्कळ कमाई केली होती. त्यामुळे या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img