24.6 C
New York

Dahi Handi : मुंबईत दहीहांडी उत्सवाला गोलबोट 41 गोविंदा जखमी

Published:

मुंबई

श्रीकृष्ण जयंतीनिमित्त मुंबईसह राज्यातील इतर भागांत दहीहंडी (Dahi Handi) उत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जात आहे. दहीहांडी उत्सवाला गोलबोट लागल्याचं समोर आलं आहे. मुंबईत (Mumbai) दहीहांडी उत्सवात तब्बल 41 गोविंदा जखमी (Govinda Injured) झाल्याचं समोर आलंय. जखमी गोविंदांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. यांसदर्भातील माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलीयं.

राज्यभरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात दहीहांडीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. दहीहांडी उत्सवात थरावर थर रचताना गोविंदा जखमी होतात. त्यामुळे या उत्सवाला गोलबोट लागत असल्याचं दिसून येत आहे. जखमी गोविदांना सरकारी आणि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून 41 पैकी 34 गोविंदांना उपचार करुन घरी सोडण्यात आलंय. तर 7 जखमी गोविंदांवर उपचार सुरु आहेत.

मुंबई आणि ठाण्यात जवळपास 1 हजार 354 दहीहंडी उत्सवांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आली आहेत. यावेळी गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 25 लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. तर ठाण्यात टेंभी नाक्याला मुख्यमंत्री शिंदेंची दहीहंडी असून बक्षिसाची रक्कम पुरुषांसाठी 1 लाख 51 हजार, महिलांसाठी 1 लाख आहे. त्याशिवाय प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीत 1 लाख रुपयाच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे.

रुग्णालयाचे नाव आणि जखमी गोविंदांची माहिती
सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये 2 जखमी गोविंदांची नोंद. एक रुग्णालयात दाखल असून एकावर उपचार सुरु.
जीटी हॉस्पिटलमध्ये एक गोविंदा जखमी.
पोद्दार हॉस्पिटलमध्ये 6 गोविंदा जखमी. उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला.
केईएम हॉस्पिटलमध्ये 8 जखमी गोविंदाना दाखल करण्यात आलं होतं. एका गोविंदाला रुग्णालयात दाखल केलं असून 7 रुग्णांना उपचार करुन सोडण्यात आलं.
नायर हॉस्पिटलमध्ये 5 जखमी गोविंदावर उपचार करण्यात आले.
सायन रुग्णालयात 3 जखमी गोविंदावर उपचार सुरु.
राजावाडी हॉस्पिटलमध्ये 3 गोविंदा जखमी दाखल.
एमटी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये 1 जखमी गोविंदा दाखल.
कुर्ला भाभा हॉस्पिटलमध्ये दोन गोविंदा जखमी झाले आहेत.
शताब्दी गोविंद हॉस्पिटलमध्ये 2 गोविंदा जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
वांद्रे भाभा हॉस्पिटलमध्ये 3 जखमी गोविंदांवर उपचार सुरु आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img