15.6 C
New York

Jammu and Kashmir Assembly Election : भाजपकडून जम्मू-काश्मीरसाठी 44 उमेदवारांची यादी जाहीर

Published:

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir Assembly Election) १० वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 44 उमेदवारांची नावे आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये उमेदवारांची नावे जाहीर करण्याबाबत भाजपने आघाडी घेतली असं म्हणावं लागेल. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे . जम्मू आणि काश्मीरमध्ये ९० जागांसाठी विधानसभेच्या निवडणुका होत आहे. २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवण्यात आले होते. त्यामुळे राज्याचा विशेष राज्य म्हणून असलेला दर्जा राहिलेला नाही. जम्मू आणि काश्मीरचे केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुपांतरीत करण्यात आले आहे. त्यानंतर पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. त्यामुळे या निवडणुकांना महत्त्व आहे.

Jammu and Kashmir Assembly Election जम्मू-काश्मीरमध्ये मोदी-शहांसह प्रमुख नेत्यांच्या 8 रॅली

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते केंद्रशासित प्रदेशात आठ सभा घेणार आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे भाजपचे निवडणूक प्रभारी राम माधव आणि जी किशन रेड्डी आज केंद्रशासित प्रदेशात पोहोचणार आहेत. या निवडणुकांमध्ये भाजप कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती करणार नाही आणि काश्मीर खोऱ्यातील ज्या विधानसभा जागांवर पक्ष निवडणूक लढवणार नाही त्या ठिकाणी मजबूत अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देईल.

पंतप्रधान मोदी लवकरच पाकिस्तान दौऱ्यावर? 

२०१४ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये शेवटच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. यावेळी राज्यात भाजप आणि पीडीपीचे सरकार होते. काही काळाने भाजपने पीडीपीशी संबंध तोडले होते. त्यानंतर जम्मू आणि काश्मीरबाबत केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला होता. दहा वर्षांनंतर पहिल्यांदा निवडणुका होणार असल्याने याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोंबर रोजी निवडणुका घेतल्या जाणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणुकीचा निकाल ४ ऑक्टोंबर रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यात २४ जागांवर, दुसऱ्या टप्प्यात २६ जागांवर तर तिसऱ्या टप्यात ४० जागांवर निवडणुका होणार आहेत

Jammu and Kashmir Assembly Election किती काश्मिरी पंडितांना तिकीट

भाजपने काश्मीर खोऱ्यात दोन काश्मिरी पंडितांना तिकीट दिलं आहे. शंगस-अनंतनाग पूर्वमधून वीर सराफ आणि हब्बाकदलमधून अशोक भट्ट यांना उमेदवार बनवण्यात आले आहे. माजी उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांचे तिकीट कापण्यात आले आहे. भाजप जम्मू आणि काश्मीरमध्ये चांगला जोर लावण्याची शक्यता आहे. भाजपच्या बड्या नेत्यांच्या जम्मू आणि काश्मीरमध्ये ८ ते १० रॅली होण्याची शक्यता आहे.

Jammu and Kashmir Assembly Election जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक: आतापर्यंत तीन राजकीय पक्षांची यादी जाहीर

डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी: डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (DPAP), जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्या पक्षाने 25 ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यादीत 13 नावे जाहीर करण्यात आली आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या विरोधात पक्षाने कैसर सुलतान गनई यांना गांदरबलमध्ये उभे केले आहे. तर माजी मंत्री अब्दुल मजीद वानी यांना दोडा पूर्व आणि राज्याचे माजी महाधिवक्ता अस्लम घनी यांना भदेरवाहमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

आम आदमी पार्टी (AAP): AAP ची पहिली यादी जाहीर झाली आहे. सात उमेदवारांची नावे आहेत. पक्षाने पुलवामामधून फैयाज अहमद सोफी, राजपुरातून मुद्दसिर हुसेन, देवसरमधून शेख फिदा हुसेन, दोरूमधून मोहसीन शफकत मीर, दोडामधून मेहराज दीन मलिक, दोडा पश्चिममधून यासिर शफी मट्टो आणि बनिहालमधून मुद्दसिर अजमत मीर यांना तिकीट दिले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img