17.6 C
New York

Jay Shah : बीसीसीआयचे सचिव जय शाह बिनविरोध आयसीसी अध्यक्ष ?

Published:

निर्भयसिंह राणे

बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) हे आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी सध्या आघाडीवर आहेत. बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, आयसीसीचे विध्यमान चेअरमन ग्रेग बारक्ले यांनी त्यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय रद्द केला आहे. ग्रेग बारक्लेंची सध्या दुसरी टर्म सुरू आहे जी 30 नोव्हेम्बर रोजी संपुष्टात येईल.

नियमानुसार, आयसीसी अध्यक्ष तीन ते चार वर्षाच्या कार्यकाळात काम करू शकतो. बारक्ले यांनी अध्यक्ष म्हणून चार वर्ष पूर्ण केली आहेत. ICC चेअरमन होण्यासाठी उमेदवाराला 51 टक्के मतं मिळणे आवश्यक आहे, म्हणजे 16 पैकी 9 सदस्यांनी उमेदवाराच्या बाजूने मतदान केलं पाहिजे.

Team India : भारतीय शतकवीर; रोहित-विराटला अजूनही सचिनच भारी..

जय शाह हे सध्याचे बीसीसीआय सचिव आहेत. सध्या जय शाहांकडे बीसीसीआय सचिव म्हणून टर्म मधले 4 वर्ष अजूनही शिल्लक आहेत. जर त्यांनी आयसीसी अध्यक्षपदासाठीची निवडणूक लढले आणि जिंकले तर ते 35व्या वर्षी हे पद स्वीकारणारे सर्वात तरुण अध्यक्ष बनतील. जगमोहन दालमिया, शशांक मनोहर, शरद पवार आणि एन श्रीनिवासन ह्या भारतीय आयसीसी अध्यक्षांच्या यादीत जय शाह समावेश करतील.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img