26.5 C
New York

Badlapur School Case : बदलापूर उद्रेकानंतर राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिकांना आदेश, म्हणाले…

Published:

मुंबई

बदलापूर येथील (Badlapur School Crime) एका शाळेतील दोन छोट्या मुलींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला असून ही घटना समोर आल्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकात पालकांचं आंदोलन सुरु आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून, बदलापूर येथील उद्रेकानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया आली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या ….

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img