24.6 C
New York

Sindhudurg Crime : विद्युत तारेचा शॉक देऊन पतीला संपवलं, क्रूर पत्नीचा हादरवणारा कारनामा

Published:

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गामध्ये (Sindhudurg Crime) नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील तरुण वसंत उर्फ सागर भगे यांना विद्युत तारांच्या जाळ्याचा शाॅक देऊन ठार केल्याप्रकरणी मयतच्या पत्नीसह सासू सासऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या प्रकाराची वेंगुर्ल्यात जोरदार चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेंगुर्ले तालुक्यातील आडेली सातेरी गाळू येथे सासरवाडीच्या मालकीच्या जागेत राहत्या घराच्या कंपाउंड मधील नर्सरीत कुडाळ तालुक्यातील माणगाव तळीवाडी येथील तरुण वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे यांना त्यांच्या पत्नीने तसेच सासू सासऱ्याने आडेली येथे बोलावून घेतले. घराच्या कंपाउंड भोवती विद्युत तारेचे जाळे तयार करून त्या विद्युत तारांच्या जाळ्यांचा शाॅक देऊन ठार मारले. वेंगुर्ले पोलिसांनी मयत वसंत उर्फ सागर भगे यांची पत्नी सुप्रिया सागर भगे, सासरे शंकर सखाराम गावडे व सासू पार्वती शंकर गावडे या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक केली आहे.

मृत तरुणाचा भाऊ संगम प्रभाकर भगे यांनी वेंगुर्ले पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103 (1), 3 (5) अन्वये वसंत भगे याची पत्नी नूतन शंकर गावडे, तिचे वडील शंकर सखाराम गावडे आणि तिची आई पार्वती शंकर गावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही संशयितांना वेंगुर्ले पोलिसांनी अटक केली आहे. आपला भाऊ घरजावई व्हायला तयार नव्हता. त्यामुळेच त्याला रितसर प्लॅन करून ठार करण्यात आले, असे संगम यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img