11 C
New York

Jawhar Tahasil : जव्हार तहसील अंतर्गत दिव्यांग कल्याण उपक्रम

Published:

संदिप साळवे, जव्हार

पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके (Govind Bodke) यांचे मार्गदर्शनाखाली महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या व राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत नागरिकांना अधिक माहिती प्राप्त होऊन योग्य लाभ प्राप्त व्हावा तसेच नागरिकांमध्ये विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी विशेष मोहीम व लोकाभमुख उपक्रम हा 1 ऑगस्ट महसूल दिनापासून महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. या महसूल पंधरवाडा अंतर्गत तहसील कार्यालय जव्हार (Jawhar Tahasil) येथे “एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा” हा उपक्रम सोमवारी सकाळी राबविण्यात आला.

दरम्यान, या उपक्रमात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत एकूण प्राप्त सात दिव्यांग लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करून मंजुरी बाबतचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब लाभार्थ साहाय्य योजना अंतर्गत एकूण चौदा लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करून त्यांनाही मंजुरी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. शिवाय उपस्थित सर्वांना हर घर तिरंगा बाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार जव्हार लता धोत्रे , जव्हार, संजय गांधी नायब तहसीलदार वसंत सांगळे यांनी संजय गांधी योजनेबाबतची माहिती दिली.जव्हार पंचायत समितीचे सहा गट विकास अधिकारी, दोंदे,संजय गांधी अ.का. शामराव आहेर, इंदिरा गांधी, अ. का. योगेश माळी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img