बांग्लादेशातील हिंसाचार अजूनही थांबलेला (Bangladesh Crisis) नाही. देशातील अल्पसंख्यांक हिंदू समाजावरील हल्ल्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात आलेली (Bangladesh Violence) नाही. काल बांग्लादेशच्या सरन्यायाधीशांना राजीनामा देण्यास आंदोलकांनी भाग पाडले. या घडामोडी घडत असतानाच बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. अमेरिकेला सेंट मॉर्टिन बेट देण्यास नकार दिला याचाच परिणाम म्हणून आज मला सत्तेतून बेदखल व्हावे लागले असा दावा शेख हसीना यांनी केला.
इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार आपल्या निकटवर्तीयाच्या माध्यमातून पाठवलेल्या एका संदेशात शेख हसीना यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. मी राजीनामा दिला. कारण मला देशात मृतदेहांचा खच पहायचा नव्हता. ते लोक विद्यार्थ्यांच्या मृतदेहांवर सत्तेत येण्यास इच्छुक होते. पण मी परवानगी दिली नाही. मी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. जर मी सेंट मार्टिन बेट अमेरिकेला सोपवलं असतं आणि बंगालच्या खाडीत अमेरिकेच्या हस्तक्षेपाला परवानगी दिली असती तर आजही मीच सत्तेत राहिले असते. आता बांग्लादेशातील नागरिकांना माझी एकच विनंती आहे की कट्टरवादी लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. इकॉनॉमिक टाइम्सने शेख हसीना यांच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की जर मी देशात थांबले असते तर यापेक्षा (Bangladesh News) जास्त लोकांचा मृत्यू झाला असता. देशाच्या संपत्तीचंही मोठं नुकसान झालं असतं. त्यामुळे देश सोडण्याचा अत्यंत कठीण निर्णय मी घेतला. परंतु मी लवकरच देशात परत येईल असे शेख हसीना म्हणाल्या.
बांगलादेशात सैन्याच्या वाहनावर जमावाचा हल्ला
Bangladesh Crisis विद्यार्थ्यांना रजाकार म्हटलंच नाही
मी बांग्लादेशातील विद्यार्थ्यांना पुन्हा सांगू इच्छिते की मी विद्यार्थ्यांनी कधीच रझाकार म्हटलेलं नाही. पण या विद्यार्थ्यांना भडकावण्यासाठी माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं. माझी विनंती आहे मी जे वक्तव्य केलं होतं त्याचा संपूर्ण व्हिडिओ आधी पहा मग काय ते ठरवा. देशाला अस्थिर करण्यासाठी षडयंत्र करणाऱ्यांनी तुमचा वापर केला असे शेख हसीना यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले.
Bangladesh Crisis चीन विरोधासाठी अमेरिकेचा दबाव
अवामी लीग पक्षाच्या (Awami League) नेत्यांनी आरोप केला आहे की अमेरिकी राजनयिक (USA) बांग्लादेशने चीन विरोधात (China) भूमिका घ्यावी यासाठी शेख हसीनांवर दबाव आणत होते. अमेरिका राजदूत पीटर हास यांनी बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीची (BNP) बाजू घेतल्याचा आरोप अवामी लीगच्या एका नेत्याने केला होता. अमेरिका सरकार मानवाधिकार आणि निवडणूक प्रक्रियेवरुन शेख हसीना आणि त्यांच्या अवामी लीग पक्षावर टीका करत होते. या वर्षातील जानेवारी महिन्यातच अमेरिकेच्या विदेश विभागाने म्हटले होते की बांग्लादेशात झालेल्या निवडणुका (Bangladesh Elections) स्वतंत्र आणि निष्पक्ष नव्हत्या त्यामुळे राजकीय पक्षांनी यात भाग घेतला नाही.