24.6 C
New York

Waqf Board : वक्फ बोर्ड विधेयकावर फडणवीसांचे मोठे वक्तव्य

Published:

मुंबई

मागच्या काळात वक्फ बोर्डात (Waqf Board) घोटाळा झाला. त्यामध्ये कुणीकुणी जमिनी लाटल्या हे सर्वांना माहिती आहे. त्या संदर्भातील अहवालही समोर आला आहे. दरम्यान, काँग्रेसवाल्यांना वक्फशी काही देणघेण नाही तर त्यांना वक्फच्या अंतर्गत येणाऱ्या जमिनींशी घेणदेण आहे असा थेट घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

रेल्वे आणि कॅथोलिक चर्चनंतर, वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक जमिनीची मालमत्ता आहे. सध्या वक्फ बोर्डाकडे ८ लाख एकरपेक्षा जास्त जमीन आहे. वक्फ बोर्डाकडे २००९ पर्यंत ४ लाख एकर जमीन होती, जी काही वर्षांत दुप्पट झाली. २०२३ मध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाने लोकसभेत सांगितलं होतं की डिसेंबर २०२२ पर्यंत वक्फ बोर्डाकडे एकूण ८ लाख ६५ हजार ६४४ स्थावर मालमत्ता होत्या. यामध्ये दुपटीने वाढ होत गेली आहे.

इस्लाम आणि अल्लाच्या नावावर धर्मादाय हेतूने दान केलेली संपत्ती म्हणजे वक्फ. ही संपत्ती मालमत्तेच्या स्वरूपात स्थावर आणि जंगम अशा दोन्ही स्वरूपाची असू शकते. मुस्लीम कायद्याद्वारे मान्यताप्राप्त धार्मिक किंवा धर्मादाय हेतूंसाठी मालमत्तांचं कायमस्वरूपी समर्पण म्हणजेच वक्फ. मुस्लिमांसाठी पवित्र, धार्मिक किंवा धर्मादाय ठरत असलेल्या कोणत्याही परोपकारी कारणासाठी ही संपत्ती दान केलेली असू शकते. एखाद्या मालमत्तेचा दीर्घ कालावधीसाठी धार्मिक किंवा धर्मादाय हेतूंसाठी वापर केला जात असल्यास ती वक्फ मानली जाऊ शकते. या मालमत्तेचा वापर सामान्यत: शैक्षणिक संस्था, दफनभूमी, मशिदी आणि निवारा गृहे चालवण्यासाठी केला जातो. वक्फसाठी मालमत्ता देणाऱ्या व्यक्तीला आपली मालमत्ता परत घेता येत नाही. कायद्याने त्या मालमत्तेला कायम वक्फची मालमत्ता म्हणूनच संरक्षण मिळतं. अशा जमिनी आणि मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वक्फ बोर्ड तयार करण्यात आलं. या जमिनीचा गैरवापर आणि अवैध मार्गाने तिची विक्री थांबवण्यासाठी वक्फ बोर्डाची निर्मिती करण्यात आली. सध्या एक केंद्रीय आणि 32 राज्ये वक्फ बोर्ड आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img