15.6 C
New York

Ghatkopar Hoarding Collapsed : भावेश भिंडेची याचिका कोर्टाने फेटाळली

Published:

मुंबई

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना (Ghatkopar Hoarding Collapsed) प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडेची (Bhavesh Bhinde) याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) फेटाळली आहे. भावेश भिंडेने जामिनासाठी आणि एफआयआर रद्द करण्याची याचिका केली होती, ज्यात त्याने होर्डिंग दुर्घटना दैवी कृत्य असल्याचा दावा केला होता आणि आपली अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) भावेशला लेखी पूर्वसूचना देऊनच अटक केल्याचे सांगितले आहे. भावेश भिंडे इगो मीडियाचे संचालक आहेत.

भिंडे याला अटक करताना योग्य कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आली. ती बेकायदा असल्याचे किंवा त्यात काही त्रुटी असल्याचे आम्हाला आढळून आले नाही. त्यामुळे, आपल्याला बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात ठेवल्याचा भिंडे याचा आरोप चुकीचा आहे, अशी टिप्पणी न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने उपरोक्त निर्णय देताना केली. खंडपीठाने भिंडे याच्या याचिकेवर बुधवारी सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर या प्रकरणी शुक्रवारी निर्णय देण्याचे स्पष्ट केले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img