11 C
New York

Kalyan : कल्याण रेल्वे स्थानकात महिला प्रवाशाला महिला तिकीट कर्मचाऱ्याकडून बेदम मारहाण

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

कल्याण स्टेशनमधील (Kalyan) तिकीट काउंटरवर महिला कर्मचाऱ्याचा प्रवासी महिलाबरोबर वाद झाल्याचा प्रकार घडला आहे. या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी इतर प्रवासी वर्गाने गोंधळ घातल्याने रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या (Railway Station) जवानांनी मध्यस्थी केली. कल्याण रेल्वे स्टेशनच्या सात नंबर प्लॅटफॉर्म वरील स्कायवॉक वर असलेल्या तिकीट काउंटर वरली घटना घडली आहें. तब्बल अर्धा तासाच्या गोंधळानंतर रेल्वे पोलिसांच्या मदतीने प्रवासी व तिकीट काउंटरवरील स्टाफ चा वाद मिटला.

दोन महिलांमध्ये मारहाण सुरू झाल्याने मध्ये कसे पडायचे असा प्रश्न पुरूष प्रवाशांमध्ये निर्माण झाला. काही पुरूष प्रवाशांनी धाडस करून दोन्ही महिलांना बाजुला केले. त्यानंतर तेथे गस्ती पथकावरील रेल्वे पोलीस आले. त्यांनी मध्यस्थी करून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला.रेल्वे महिला तिकीट कारकुनाने प्रवासी महिलेला केलेल्या मारहाणीची दृश्यचित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img