24.6 C
New York

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचे नारायण राणेंना प्रतिउत्तर, म्हणाले..

Published:

मुंबई

भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात (Manoj Jarange Patil) नवा वाद निर्माण झाला आहे. खासदार नारायण राणेंनी मनोज जरांगेंना ताकीद दिली होती की त्यांनी देवेंद्र फडणवीस बोलू नये. तरीही ते जर बोलले तर मग आम्ही सुद्धा बोलणार असे राणे म्हणाले होते. त्यांच्या याच टीकेला आज मनोज जरांगे पाटील यांनीही जशास तसे उत्तर दिले आहे. नारायण राणेंना उगाच मला धमक्या देऊ नयेत अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी सुनावलं आहे. जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार राणे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी नारायण राणेंना मानतो. निलेश राणेंनी त्यांना समजावून सांगावं. मी त्यांना काहीच बोलत नाही. मी शांत आहे. पण जर मी बोलायला लागलो तर थांबणारा नाही. नारायण राणेंनी उगाच मला धमक्या देऊ नयेत. नारायण राणेच नाही तर अन्य कुणीही मला फुकट धमक्या देऊ नयेत. काहीही झालं तरी आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहोत. माझा मराठा समाजही ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा आदरच करतो. पण ते काय नवीन काढत आहेत असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सध्या सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना काहीच सुचेनासे झाले आहे. त्यामुळे ते काहीच बोलत नाही. सरकार राहिल की नाही याचीच चिंता त्यांना जास्त वाटत आहे. हे बहुधा भाकरी खात नसावेत ताक पित असावेत. आता त्यांच्याकडून मला उचकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मी त्यांना काहीच उत्तर देणार नाही. त्यांच्यासारखा मी माझा स्वाभिमान गहाण टाकलेला नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी पक्षांवर केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img